बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपचे माजी जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) कॉंग्रेसचे माजी मंत्री आणि सह आरोपी विनय कुलकर्णी यांचे नातेवाईक चंद्रशेखर इंदी यांना अटक केली आहे. सीबीआयने ५ नोव्हेंबर रोजी कुलकर्णी यांना अटक केली होती. चंद्रशेखर यांच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आठवर गेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांनी आरोपी, मुख्य आरोपी बासप्पा शिवाप्पा मुत्तगी यांना बनावट पिस्तूल पुरविली होती, जी गौडाच्या हत्येसाठी वापरली जात होती. सीबीआयने यापूर्वी मुत्तगी कडून तीन प्रतिबंधित पिस्तूल जप्त केली होती. त्यातील एकाचा गुन्ह्यात वापर करण्यात आला होता.
१५ जून, २०१६ रोजी भाजपा जिल्हा पंचायत सदस्य गौडा यांना धारवाड येथे जिमच्या बाहेर अज्ञात दुचाकीस्वारांनी ठार मारले.