बेंगळूर/प्रतिनिधी
धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगेशगौडा हत्येप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांना जामीन मंजूर करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार देत हा अर्ज फेटाळून लावला.
न्यायमूर्ती के.नटराजन यांच्या खंडपीठाने सांगितले की, आरोपी पूरक बाबींची पूर्तता न करता वारंवार जामीन अर्ज सादर करीत आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
सीबीआयचे वकील पी प्रसन्नकुमार यांनी युक्तिवाद केला की गौडा यांच्या हत्येच्या कटात आरोपींचा सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी जोरदार पुरावे उपलब्ध आहेत. जर आरोपींना जामीन दिल्यास पुरावे नष्ट होऊ शकतात.
कुलकर्णी यांचे वकील शशिकिरण शेट्टी यांनी सीबीआयने आपला तपास पूर्ण केला आहे आणि दोषारोपपत्र सादर केले आहे. ते म्हणाले, “अर्जदाराचा या खुनाशी संबंध नाही. त्यामुळे जमीन मंजूर करावा. परंतु कोर्टाने विनय कुलकर्णीचा जमीन अर्ज नामंजूर केला.









