ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता योगी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
योगी सरकारमधील मंत्री जय कुमार सिंह जैकी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वतः जय कुमार यांनी फेसबुकवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

ते आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले की, कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर मी 9 सप्टेंबर रोजी माझी कोरोनाची चाचणी करून घेतली. त्याचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे.
सर्वांना आवाहन आहे की मागील आठवड्यात जे लोक माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घ्यावे तसेच आवश्यकता पडल्यास कोरोना चाचणी देखील करून घ्यावी.
दरम्यान, सद्य स्थितीत उत्तर प्रदेशात 67,321 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत 2 लाख 27 हजार 442 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.









