ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार याचं उत्तर त्यांनी अद्याप दिलेलं नाही. माध्यमांशी अनौपचारीक संवाद साधत असताना त्यांनी ही माहिती दिल्यांचं एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तामधून समोर आलं आहे. कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहात? असे विचारले असता ते म्हणाले की, पक्ष सांगेल तिथूनच मी लढेन. कोणत्याही मतदार संघातून लढण्यास मी तयार असून, माझी वैयक्तिक कोणतीही पसंती नाही, असे म्हटले आहे.









