उत्तरप्रदेश सरकार 27 जानेवारीपासून 5 दिवसीय गंगायात्रा सुरू करणार आहे. या यात्रेचा प्रारंभ बिजनौरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्तेच होणार आहे. ही यात्रा पश्चिम उत्तरप्रदेशात गंगा काठावरील 26 जिल्हय़ांमधून जात 1025 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. पूर्व उत्तरप्रदेशच्या बलिया जिल्हय़ात या यात्रेचा समारोप होणार आहे.









