बिजनौर
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिजनौर येथून गंगा यात्रेचा शुभारंभ केला आहे. 5 दिवसांपर्यंत चालणारी ही यात्रा दोन मार्गाने आयोजित केली जात आहे. बिजनौर ते कानपूर तर दुसरी बलियाहून कानपूरमध्ये आयोजित होत आहे. बलियामध्ये राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी यात्रेचा शुभारंभ केला असून या सोहळय़ाला बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे देखील उपस्थित होते.
गंगा आमच्या श्रद्धेचा तसेच अर्थव्यवस्थेचा भाग आहे. हजारो वर्षांपासून गंगामाता प्रत्येक भारतीयाला तारण्याचे काम करत आहे. गंगा खोऱयाचे क्षेत्र जगाचे पोट भरण्याची क्षमता बाळगून असल्याचे म्हणत गंगेत शव प्रवाहित करू नका असे आवाहन योगींनी यावेळी केले आहे.
87 विधानसभा, 26 लोकसभा मतदारसंघ आणि 27 जिल्हय़ांमधून ही यात्रा जणार आहे. दोन्ही यात्रा रस्तेमार्गाने 1238 तर नौकेने 150 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. गंगा काठावर 1040 ग्रामपंचायत, 1656 महसुली गावे आणि 21 नगरपालिकांचा अंतर्भाव होतो.









