मौर्य, पाठक यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली
ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एका मोठ्या समारंभात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित असलेल्या एका समारंभात उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आदित्यनाथ यांना शपथ दिली.
आदित्यनाथ यांची गुरुवारी यूपीमधील भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली, त्यानंतर त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. शपथविधी सोहळा अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता, ज्याची 50,000 लोकांची क्षमता आहे. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने 403 पैकी 273 जागा जिंकल्या होत्या.









