तरुण भारत ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. येत्या २५ मार्च ला योगी यांच्या शपथविधीचा मेगा इव्हेंट होणार आहे. लखनऊच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर योगी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात १२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि पाच उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
या शपथविधी सोहळ्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्याशिवाय विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आघाडीचे उद्योगपती आणि ४९ कंपन्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचे एन. चंद्रशेखरन, अंबानी ग्रुपचे नीरज अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचाही समावेश असेल. यासोबतच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव, बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे.









