शुक्रवार दि. 8 जानेवारीपासून प्रारंभ
प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर स्पोर्टस् यांच्यावतीने येळ्ळूर आर्मी चषक फुलपिच ग्रामीण क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 8 जानेवारीपासून या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 25555 व चषक तर दुसरे बक्षीस 15555 व चषक आहे. याचबरोबर वैयक्तिक इतर बक्षिसेही असून ज्या संघांना स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्यांनी मोबाईल क्रमांक 9986380429, 9740391017 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









