येळ्ळूर ः
श्री चांगळेश्वरी देवी, श्री कलमेश्वर, श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस व महाराष्ट्र कुस्ती मैदान संयुक्त यात्रोत्सव कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आल्याचे चांगळेश्वरी देवी मंदिर ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.
देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या नियमावलीमुळे यावषीचा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी वामन रवळू पाटील होते. बैठकीला सर्व सदस्य, कार्यकारी मंडळ उपस्थित होते. यल्लोजी तोपिनकट्टी, दौलत कुगजी, दुदाप्पा बागेवाडी, तानाजी हलगेकर, राजू पावले, शिवाजी कदम, महादेव मंगनाईक, प्रकाश पाटील, मनोहर पाटील, वाय. सी. इंगळे व पुजारी उपस्थित होते.









