प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूर ग्राम पंचायत येथील वाचनालयामध्ये बालदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्राम पंचायतीचे माजी गटनेते वामन पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत माजी सदस्य राजू उघाडे, राजू पावले, तानाजी हलगेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून येळ्ळूरवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाटील होते. यावेळी त्यांनी वाचनामुळे माणसाचे जीवन बदलते. तेव्हा बालपणापासूनच वाचन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आतापासूनच वाचनाकडे लक्ष द्यावे, असे सांगितले. याचबरोबर जीवनामध्ये कितीही वाचन झाले तरी ते कमीच असते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सूर्यवंशी यांनी केले. प्रशांत सुतार यांनी आभार मानले. कलमेश कोकणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाला पुंडलिक तळवार, शिवाजी हुवाण्णावर, कृष्णा तुळजाई, गौंडवकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.









