सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर येथील वेशीमध्ये असलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयात सुरू आहे. गुरुवारी सीसी क्र. 166 आणि 122 या खटल्यांची सुनावणी होणार आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे.
सीसी क्र. 166 मध्ये नामदेव कदम, नागराज कुगजी, हणमंत लुमाण्णा कुगजी, राजू नायकोजी, सुधीर धामणेकर, आनंद मुचंडी, मारुती अष्टेकर, जयसिंग अष्टेकर, दीपक खादरवाडकर, पवन पोटे, उत्तम धामणेकर, हणमंत धामणेकर, जयवंत टक्केकर, सुनील मुतगेकर, सदानंद मोटे, प्रशांत मुतगेकर, परशुराम धामणेकर, मनोहर मजुकर, राजू मासेकर, पुंडलिक जाधव, परशराम जाधव, सूरज घाडी, बाळू धामणेकर, रजत संभाजीचे, कपिल भोई, बसवराज कलमठ, विकास नंदी, परशुराम नंदी, विलास नंदी, अतुल मुचंडी यांना गोवण्यात आले आहे.
सीसी क्र. 122 मध्ये अर्जुन गोरल, रमेश घाडी, नंदू कुगजी, मारुती देसाई, पिंटू धामणेकर, सूरज नायकोजी, बसवंत लोहार, श्रीकांत नांदुरकर, सागर काकतकर, सतीश जाधव, अमित जाधव, मनोहर कुंडेकर, विठ्ठल कुरंगी, शंकर कणबरकर, परशराम कंग्राळकर, अनंत कंग्राळकर, अरुण यळ्ळूरकर (मयत), शिवाजी जाधव, प्रशांत कुगजी, अर्जुन चौगुले, बाळू मजुकर, प्रवीण धामणेकर, प्रशांत टक्केकर, परशुराम धामणेकर, अनंत कुंडेकर, मधू कुगजी, नारायण कंग्राळकर, कृष्णा काकतकर, अशोक धामणेकर, तानाजी हलगेकर, अनंत पाटील, मारुती गोरल, चांगाप्पा हलगेकर, संजय गोरल, अरविंद पाटील, नारायण काकतकर, शिवाजी काकतकर, सुशांत जाधव, शामला जाधव, सुधा जाधव, मालन जाधव, कमला पोटे, जयश्री खादरवाडकर, रामचंद्र बागेवाडी, विकास पाटील, सुनील पाटील, सतीश कुगजी यांना गोवण्यात आले आहे. या दोन्ही खटल्यांतील कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी 10.30 वा. न्यायालयात हजर राहावे, असे आवाहन ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. श्याम पाटील यांनी केले आहे.
तारीख पे तारीख
2015 मध्ये ही घटना घडली आहे. त्यानंतर या खटल्यातील साक्षीदार नेहमीच गैरहजर राहत आहेत. त्यामुळे येळ्ळूरच्या या सर्व कार्यकर्त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक साक्षीदारांना वॉरंट बजावूनदेखील ते गैरहजर राहत आहेत, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. असे असले तरी येळ्ळूरच्या कार्यकर्त्यांनी मात्र उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









