दुसऱया बँकेची शाखा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी : नागरिकांची गैरसोय
प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूरमधील एकमेव असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ग्राहकांना योग्य प्रकारे सेवा दिली जात नाही. याबाबत वारंवार तक्रारी वाढल्या आहेत. कार्पोरेशन बँक आता युनियन बँकेमध्ये वर्ग झाली असली तरी त्याचे काम योग्यप्रकारे सुरू नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत. ग्राहकांना सकाळीच येऊन बँकेसमोर थांबावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशीच अवस्था राहिल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
संगणक नेहमीच बंद असते. बँकमध्ये काही मोजकेच कर्मचारी कार्यरत आहेत. ते ग्राहकांशी योग्य प्रकारे बोलत नाहीत. उद्या या, अशी उत्तरे दिली जात आहेत. आपल्या बँक खात्यावर किती रक्कम आहे हे देखील समजणे अवघड झाले आहे. वारंवार आधारकार्ड, छायाचित्र, पॅनकार्ड यांची प्रत मागण्यात येत आहे. आम्ही किती वेळा अशा प्रकारे ही कागदपत्रे द्यायची, असा प्रश्न देखील ग्राहक करत आहेत.
गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना कधीच या बँकेमधून कर्ज दिले जात नाहीत. जे नियमित कर्ज भरणा करतात त्यांनाच कर्ज देण्यात येते, अशा तक्रारीही होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातूनच दिल्या जातात. मात्र या बँकेच्या कामकाजामुळे अनेक योजना वाया जात आहेत. बँक योग्य प्रकारे चालवायची नसेल तर दुसऱया बँकेला या ठिकाणी शाखा उघडण्यास सध्याच्या युनियन बँकेने एनओसी द्यावी, अशी देखील मागणी होत आहे.
बसण्यासाठी देखील जागा नाही
बँकेमध्ये वृद्ध महिला व नागरिक गेले असता त्यांना बसण्यासाठी देखील जागा नाही. सदर बँक ही अत्यंत लहान जागेमध्ये आहे. बँकेमध्ये योग्य प्रकारे अंतर्गत सोय करण्यात आली नाही. ग्राहकांना बँकेच्या बाहेरच रिघ लावावी लागत आहे. कोरोनाचे कारण पुढे करून आता तर सर्वसामान्य जनतेची जणू परीक्षाच घेण्यात येत आहे. विद्यार्थी किंवा महिला गेल्यानंतर त्यांना उद्धट उत्तरे देण्याचे प्रकार वाढले आहेत. तेंव्हा सदर बँकेच्या वरि÷ अधिकाऱयांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांना आणि कर्मचाऱयांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









