प्रतिनिधी/ येळ्ळूर
शिवाजीनगर येळ्ळूर येथे ठेवण्यात आलेल्या गवतगंजीला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले आहे. पांडुरंग कुगजी यांची ही गवतगंजी होती. सोमवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान ही घटना घडली. तातडीने नागरिकांनी अग्नीशामक दलला याची माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमक दलाचा पाण्याचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि आग आटोक्यात आली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
शिवाजी रोड येथील शेतकरी पांडुरंग कुगजी यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गवतगंजी रचली होती. या गवतगंजीला लागूनच अनेक घरे आहेत. सोमवारी अचानक या गवत गंजीला आग लागली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. शेजारी घरे असल्यामुळे भिती व्यक्त करण्यात आली. तातडीने काही तरूणांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणांना यामध्ये यश आले नाही. त्यामुळे अग्नीशामक दलाला कळविण्यात आले. तरूणांनी पाण्याचाफवारा केल्यामुळे काही प्रमाणात आग काही वेळ आटोक्यात आली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत या शेतकऱयाचे जवळपास चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीनेगौद्ररूप घेतले असते तर शेजारी असलेल्या धंदांनाही मोठा फटका बसला आहे. सुदैवानेच मोठी हानी झाली नाही.









