ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, जितेंद्र आव्हाड आता कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करणार आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती ट्विट करून दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारानंतर आव्हाडांची प्रकृती सुधारली आणि त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. त्यानंतर आज दोन महिन्यांनी आव्हाड यांनी रक्त तपासणी केली असता सर्व नॉर्मल आल्यानंतर त्यांनी आज प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाबद्दल सांगताना ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला.आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यातुन मी बराही झालो.मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे.येत्या दोन दिवसात मी हाॅस्पीटलमध्ये जाऊन प्लाझ्मा डोनेट करणार आहे.









