बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कधीही सोडण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच माध्यमांनी त्यांना खलनायक म्हणून दाखवू नका असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांपासून दूर करण्याचा प्रयत्न करु नका असेही ते म्हणाले. तसेच येडियुरप्पा यांच्या बदलीची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांपैकी आपण एक आहोत, असा आरोप योगेश्वर यांनी फेटाळून लावला.
“येडियुरप्पा हे आमचे मुख्यमंत्री आहेत. आपल्याला आम्हाला खलनायक का बनवायचा आहे? आम्ही येडियुरप्पा यांना पदावरून दूर करण्याचा प्रयत्न करीत नाही,” असे योगेश्वर यांनी पत्रकारांना सांगितले. मंत्री पुढे म्हणाले, “आमच्यात अंतर्गत अडचणी आहेत आणि मी दिल्ली येथे माझ्या अडचणी सांगितल्या आहेत.”
तसेच येडियुरप्पाचे कथित निषेध करणारे आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल ते म्हणाले की आम्ही दोघेही मित्र आहे. “जेव्हा मी त्यांच्या मतदारसंघात जाईन तेव्हा मी त्यांना (यत्नाळ) भेटलेच पाहिजे. त्यात काय चुकले आहे?” असे योगेश्वर यांनी म्हंटले.









