ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांच्या ताफ्यातील गाडी तुहारुलीजवळ उलटली. या अपघातात एक जण जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
स्वतंत्रदेव सिंह आज झांसीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या आडून राजकारण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, ममताजीही स्वत: जप करत असतील, पण व्होट बँकेला खूष करण्यासाठी जय श्रीरामच्या घोषणेवर त्यांनी आक्षेप घेतला. ममतांनी पक्षपाती राजकारणाच्यावर जाऊन विचार करायला हवा.









