ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये एका इसमानं ओलीस ठेवलेल्या 20 लहान मुलांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आरोपी सुभाष बाथमचा पोलीसांनी खात्मा केला आहे. तब्बल 11 तासांनंतर हे थरारनाटय़ संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला 10 लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारनं केली आहे.
या कारवाईत पाच पोलिसांसह सहा नागरिक जखमी झाले आहेत. तसंच आरोपीच्या घरातून एक रायफल आणि पिस्तुलही जप्त करण्यात आली. काही लोकांनी आरोपीच्या गरावर दगडफेक केली. यामध्ये आरोपीच्या घराचा दरवाजा तुटला. हीच संधी साधून पोलिसांनी कारवाई केली.
मुलांच्या सुटकेची कारवाई तब्बल 8 तास चालली. पोलिसांनी सातत्यानं आरोपीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्रांच्या मदतीनं त्याला समजावून पाहिलं. मात्र, त्यानं पोलिसांचं आवाहन धुडकावून लावलं, अशी माहिती यूपीचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी दिली.









