ऑनलाईन टीम / पुणे :
केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या तारखा आज जाहीर केल्या. 4 ऑक्टोबर रोजी यूपीएससीची पूर्व परीक्षा होईल. तर मुख्य परीक्षा 8 जानेवारीला घेण्यात येईल. आयोगाने आपल्या संकेतस्थळावर या तारखा जाहीर केल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपीएससीने पूर्व आणि मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मात्र, आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बैठकीत विविध परीक्षा आणि मुलाखतींच्या तारखा ठरवण्यात आल्या.
आयोगाने यापूर्वी 31 मे 2020 ही पूर्व परीक्षेची तारीख निश्चित केली होती. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ती 2 जूनला घेण्यात येणार होती. मात्र, कोरोना परिस्थिती नियंत्रणात न आल्याने आयोगाने ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. त्यावर आज निर्णय झाला. त्यानुसार 4 ऑक्टोबरला ही पूर्व परीक्षा होईल.









