ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
एमिरेट्स मार्स मिशन (ईएमएम) या मोहीमे अंतर्गत सोडलेल्या प्रोब होप या दुर्बिणीने मंगळाच्या गूढ वातावरणाच्या आश्चर्यकारक प्रतिमा मिळवल्या आहेत. ज्यामुळे मंगळ लाल ग्रहाचे वातावरण, त्याचे चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारा यांच्यातील परस्पर संवादाबद्दल नवीन अंतर्दृष्टी प्रदान करतील.
मंगळाच्या वातावरणातील डेटा गोळा करणे हे होप दुर्बिणीचे मुख्य उद्दिष्ट आहे. मंगळावरील ऑरोरा म्हणजे वातावरणाचे चुंबकीय क्षेत्र आणि सौर वारा यांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रतज्ञान वापरले आहे.
संशोधकांच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय विज्ञान क्षेत्राला ही माहिती मंगळासाठी जागतिक हवामान नकाशा तयार करण्यात मदत करेल, तसेच ग्रहाचे हवामान चक्र समजून घेता घेईल आणि वातावरणाच्या विविध स्तरांमधील हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या हालचालींचा मागोवा घेईल.
हा अरोरा पृथ्वीवर दिसणार्या उत्तरेकडील प्रकाशाच्या लाटाप्रमाणे हलचाल करत आहे. जेव्हा सौरक्रिया मुळे मंगळाच्या वातावरणात अडथळा आणतो तेव्हा ते ग्रहावर दिसतात. या मोहीमेच्या संशोधनातील शोधतील नवीन निरिक्षणांमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेल्या घटनेचा समावेश आहे. या नविन अरोरास ‘सिनियस डिस्क्रिट अरोरा’ असे नाव दिले आहे.








