कणकवली / प्रतिनिधी-
शिवसेना पक्षप्रमुख , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे संचालक, नगरसेवक सुशांत नाईक यांची जिल्हा युवा अधिकारी (कणकवली विधानसभा) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये जिल्हा युवा अधिकारी सुशांत नाईक ( कणकवली विधानसभा ) , जिल्हा समन्वयक – गितेश कडू यांचा समावेश आहे. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.









