प्रथमेश मुरगोड आणि पीटर परेरा यांनी केले रक्तदान
ओटवणे / प्रतिनिधी:
सावंतवाडीतील श्री साई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या तळवडे येथील राशी रोहिदास गावडे यांना तात्काळ ए पॉझीटीव्ह या रक्तगटाच्या दोन ब्लड बॅगची आवश्यकता होती. याबाबत माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी आवाहन करताच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. त्यानंतर युवा रक्तदाता संघटनेचे प्रथमेश मुरगोड आणि पीटर परेरा यांनी सावंतवाडी रक्तपेढीत जात रक्तदान केले. यावेळी युवा रक्तदाता संघटनेसह रक्तदाते व मंगेश तळवणेकर यांचे गावडे कुटुंबियांनी आभार मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









