प्रतिनिधी / कोल्हापूर
युवा पत्रकार अमृत राजाराम मंडलिक (वय 29, रा. मंडलिक वसाहत, सध्या रा. पाचगाव) यांनी सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोल्हापूरच्या पत्रकारीतेतील एका उदयोन्मुख पत्रकाराची अचानक एक्झीट झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मंडलिक यांनी कोल्हापुरी फुटबॉलमध्ये चमक दाखविली होती. फुटबॉल खेळत असताना मंडलिक यांनी 2016 मध्ये शिवाजी विद्यापीठातून एमजेसीची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्थानिक वृत्तवाहिनीसह वृत्तपत्रातही पत्रकार म्हणून काम केले. शांत, मितभाषी असणाऱया मंडलिक यांच्यात नवीन शिकण्याची उर्मी होती.
दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर ते आपल्या आईंसह पाचगाव येथील घरी राहण्यास गेले होते. गेले काही दिवस ते मानसिक तणावाखाली होते. सोमवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या निधनावर कोल्हापूर प्रेस क्लबने शोक व्यक्त केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









