मॅटर्निटी हॉस्पिटलना सॅनिटायझर यंत्रे, कुडचडे बाजारात मास्कचे वाटप
प्रतिनिधी /कुडचडे
आम्ही जे उपक्रम राबविले आहेत ते लोकहितार्थ राबविलेले आहेत. कारण ज्या वेळेस पहिल्यांदाच महामारीचे संकट आले तेव्हा आपली तयारी नव्हती. त्यामुळे बऱयाच अडचणींना सामोरे जावे लागले. दुसरी लाट आल्यावरही बऱयाच जणांना स्वतःचा जीव गमवावा लागला. त्यामुळे कित्येक कुटुंबांवर संकट कोसळले. याची दखल घेऊन आणि तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन कुडचडेतील तिन्ही मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशिन देण्यात आली आहेत. त्याचबरोबर कुडचडे बाजारातील विपेत्यांना व इतर लोकांना मिळून एक हजार एन-95 मास्कचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती युवा दे कुडचडे या संघटनेचे अध्यक्ष रोहन देसाई यांनी दिली.
तसेच नुकताच मान्सून सुरू झाला असून विविध प्रकारची रोगराई वाढू नये यासाठी फॉगिंग करण्यात आले आहे व परत थोडय़ा दिवसांनी आवश्यक त्या ठिकाणी करण्यात येणार आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत किशन सावंत, संदीप नाईक व इतर सदस्य उपस्थित होते. युवा दे कुडचडे या संघटनेतर्फे जो उपक्रम राबविण्यात आला आहे तो बरोबर वेळेवर राबविला गेला आहे. कारण आता तिसरी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गरोदर महिला, नुकतेच मूल झालेल्या दांपत्यासाठी व पंधरा वर्षांखालील मुलांच्या पालकांसाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. यापुढेही असे वेबिनार घेण्यात येणार आहे, असे डॉ. बुवाजी यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे महामारीची दुसरी लाट आली, तरी काही लोकांचा लस घेण्याबद्दलचा दृष्टिकोन बदललेला नाही. हे चुकीचे असून प्रत्येकाने लस घेतली, तर या महामारीपासून लांब राहणे सहज शक्मय होईल. लस घेतल्याने कोणतेच साईड इफेक्ट्स होत नाहीत. फक्त आपण लस घेतल्यावर काही गोष्टींचे पालन करावे, असे डॉ. बुवाजी यांनी सांगितले.









