ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या 8, 9 जानेवारीला नाशिकला होणारे युवासेना राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, युवासेनेचे राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन नाशिक येथे 8, 9 जानेवारीला होणार होते. मात्र, राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या तसेच ओमिक्रॉनचे संकट यामुळे हे अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी व राज्य सरकारच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करण्याच्या सूचना युवासेनाप्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून अधिवेशनाची पुढची तारीख जाहीर केली जाईल, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.








