अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील मौजे नागणसूर येथे 30 वर्षीय युवकाने अज्ञात कारणामुळे राहत्या घरी फेट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्यापूर्वी घडली. याची अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की या घटनेची खबर मयताचा भाऊ सायबन्ना गुरन्ना जेऊरे वय 49 राहणार नागणसूर तालुका अक्कलकोट यांनी दिली. मयत व्यक्तीचे नाव संतोष गुरन्ना जेऊरे वय 30 असे आहे. आज सोमवार (दि.14) रोजी सकाळी 11-00 वा.चे पुर्वी मौजे नागणसुर ता.अक्कलकोट येथील मयत राहत असलेल्या घरात संतोष गुरण्णा जेऊर हा कोत्यातरी अज्ञात कारणावरून फेटयाने गळफास घेवून मयत झाला. याची अकस्मात मयत नोंद झाली असून याचा अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश जाधव हे करीत आहेत.