वृत्तसंस्था / बेल्जियम :
युरोपीय संघाकडून (इयु) नवीन 5-जी नेटवर्क उभारणीसाठी पायाभूत सुविधा लागू करण्यासाठी नियमावली तयार करणार असल्याची घोषणा केली आहे. संघाने सदस्य देशांसाठी सुरक्षेचा मुद्द समोर ठेवत विशेष काळजी घेण्यासाठीचा सल्ला दिला आहे. परंतु चीन तंत्रज्ञान कंपनी हुआईवर बंदी न लावण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपीय संघ युरोपमधील 28 देशांचा संघ आहे. तर चालू महिन्याच्या अंतिम पर्यंत ब्रिटन या संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. यानंतर एकूण सदस्य संख्या 27 वर राहणार आहे.
युरोपीय संघाच्या संदस्य देशाचे मूल्याकन
नवीन5-जी नेटवर्क सुरु करण्यात अगोदर त्यासंबंधी असणाऱया जबाबदाऱयांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे संघाने म्हटले आहे. पुरवठादाराना महत्वपूर्ण आणि संवेदनशील मानण्यात येणाऱया संपत्तीचा पुरवठा करण्यास बंद घालण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्येच ब्रिटनकडून हुआईला 5-जी नेटवर्क निर्मितीसाठी प्रवेश दिला आहे. तर ब्रिटनमधील कंपन्या हुआईच्या उपकरणाचा वापर करु शकणार आहेत. परंतु संवेदनशील ठिकाणी हुआईला प्रवेश दिलेला नाही.
अमेरिकेत हुआईला प्रतिबंध
मागील वर्षात अमेरिकेत हुआईला प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्यानंतर अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने अन्य देशावर हुआईवर प्रतिबंध लावण्यासाठी दबाव आणला होता. सध्याच्या ब्रिटनच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठीचा सल्ला अमेरिकेने दिला आहे.