वृत्तसंस्था/ अँटवर्प
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या युरोपियन खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या नवोदित युगो हंबर्टने एकेरीचे जेतेपद मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या डी मिनॉरचा पराभव केला.
या स्पर्धेतील झलेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात हंबर्टने आठव्या मानांकित डी मिनॉरचा 6-1, 7-6 (7-4) असा पराभव करत जेतेपद पटकाविले. एटीपी टूरवरील हंबर्टचे हे दुसरे जेतेपद आहे. गेल्या जानेवारीत हंबर्टने एटीपी टूरवरील आपले पहिले जेतेपद ऑकलंड स्पर्धेत पटकाविले होते. चार वर्षांपूर्वी या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला आणि या कालावधीत जेतेपद मिळविणारा हंबर्ट हा फ्रान्सचा तिसरा टेनिसपटू ठरला आहे. 2016 साली फ्रान्सच्या गॅसकेटने तर 2017 साली त्सोंगाने ही स्पर्धा जिंकली होती.









