17ते 25 जुलै अखेर हंगेरी येथे होणार स्पर्धा
वार्ताहर / औंध
जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने हंगेरी (युरोप) येथे होणाऱ्या जागतिक कँडेट कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाने आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड यांची निवड केली आहे. ही स्पर्धा 17ते 25 जुलै अखेर होणार आहे.
प्रा. गुंड हे जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच आहेत. आतापर्यंत त्यांनी जागतिक कुस्ती स्पर्धा, आशियाई स्पर्धा, आँलम्पिक पात्रता स्पर्धा अशा 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, संपत साळुंखे, ललित लांडगे कार्यकारणीचे सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









