743 वर्षे जुन्या हल मेळय़ात 250 प्रकारचे झोपाळे
16 ऑक्टोबरपर्यंत चालणार मेळा
इंग्लंडमध्ये 2.70 लाख लोकसंख्या असलेल्या किंग्स्टन अपॉन हल शहरात 743 वर्षे जुना ‘हल’ फेयर (मेळा) सुरू झाला आहे. हा युरोपमध्ये सर्वात मोठा मेळा आहे. 8 दिवस चालणाऱया या मेळय़ात दरवर्षी सुमारे 10 लाख लोक पोहोचतात. या मेळय़ात 250 प्रकारचे छोटे-मोठे झोपाळे लावण्यात आले आहेत, याचमुळे या मेळय़ाला विशेष स्वरुप प्राप्त करून देतात. या मेळय़ात जगभरातील लोक सहभागी होत असतात.

हा मेळा 16 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मागील वर्षी हा मेळा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आला होता. तर 2019 मध्ये 9 लाखांहून अधिक लोक या मेळय़ात सामील झाले होते.
1278 मध्ये प्रारंभ
किंग्स्टन अपॉन हल सिटीत होणारा हा मेळा युरोपमधील सर्वात जुना मेळा आहे. मार्च 1278 मध्ये या मेळय़ाच्या आयोजनास प्रारंभ झाला होता. तेव्हा हा मेळा 80 झोपाळय़ांसोबत सुरू झाला होता. पण काही काळानंतर याचे आयोजन ऑक्टोबरमध्ये होऊ लागले. युरोपमध्ये मेळय़ांना एक विशेष स्थान प्राप्त असून तेथे परंपरांचे पालन करण्यावर भर दिला जातो.









