ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. आपल्याला मिळालेल्या शुभेच्छांसाठी योगी आदित्यनाथ यांनी शुभेच्छुकांचे आभारही मानले आहेत.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांना 14 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. घशात खवखव आणि हलका ताप जाणवल्यानंतर योगी आदित्यनाथ आयसोलेट झाले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर होम आयसोलेशनमध्ये राहून तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्यावर उपचार होते.
होम आयसोलेशनमध्ये असतानाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचे काम आणि बैठका सुरू होत्या. कोविड विशेष टीम-11 च्या अधिकाऱ्यांसोबतही ते सतत संपर्कात होते.
दरम्यान, डॉक्टरांची एक टीम अजूनही मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. दर दोन तासांनी मुख्यमंत्र्यांची ऑक्सीजन लेव्हल, तापाचा प्लस रेट, ब्लड प्रेशर आदींची पूर्ण माहिती घेतली जात आहे.









