ऑनलाईन टीम / लखनऊ :
लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. मागील 24 तासात 35,156 नवे रुग्ण आढळून आले. तर 298 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 3 लाख 09 हजार 237 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाचे एसीएस अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, काल दिवसभरात 25 हजार 613 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 8 लाख 96 हजार 477 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 2,25, 312 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 35,156 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. प्रदेशात आतापर्यंत 12 हजार 238 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.









