जानेवारीत विक्रमी उलाढाल : नीति आयोग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चालू वर्षातील पहिल्या महिन्यामधील ऑनलाईन देवाणघेवाणमध्ये विक्रमी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नीति आयोगाच्या माहितीनुसार जानेवारी 2021 मध्ये युपीआयमध्ये उचांकी 230 कोटीपेक्षा अधिकची संख्येने व्यवहार झाले आहेत. याच दरम्यान एकूण 4 लाख 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची देवाणघेवाणीची नेंद करण्यात आली आहे.
मागील वर्षातील जानेवारी 2020 च्या तुलनेत युपीआय देवाणघेवाणीची संख्या 76.5 टक्क्यांनी वधारली आहे. रुपयामध्ये ही देवाणघेवाण पाहिल्यास हा आकडा दुप्पट झाल्याचे दिसून येते.
मे महिन्यापासून तेजीचा प्रवास कोरोना पूर्व कालावधीमधील आकडेवारी पाहिल्यास फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वाधिक डिजिटल व्यवहार झाले होते. फेब्रुवारीत 133 कोटीपेक्षा अधिक संख्येने युपीआयच्या माध्यमातून व्यवहार होऊन 2 लाख 22 हजार कोटी रुपयापेक्षा अधिकच्या रक्कमेची देवाणघेवाण झाली आहे. एप्रिलमध्ये एक लाख 51 हजार कोटीवर युपीआय देवाणघेवाण झाली होती. परंतु मे महिन्यापासून आतार्यत प्रत्येक महिन्याला युपीआयच्या आधारे 2 लाख 18 हजार कोटी रुपयाहून अधिकचे व्यवहार झाले.









