प्रतिनिधी / जत
वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी युक्रेन या देशात गेलेले जत तालुक्यातील तीन विद्यार्थी युद्धाच्या संकटातून बाहेर आले आहेत. यामुळे पालकानी सोडला सुटकेचा निश्वास सोडत, राज्य व केंद्र सरकार चे मानले आभार मानले. जत मधील ही तीन मुले केव्हा येणार याकडे सर्वांचे लक्ष होते. पालक, प्रशासन सतत त्यांच्या संपर्कात होते.
जत तालुक्यातील बिळूर येथिल श्री. मनोज पिरगोंडा पाटील यांचे चिरंजीव डॉ. यश पाटील, तिप्पेहळळी येथिल श्री.गणपती शिंदे यांची मुलगी डाॅ. वैष्णवी शिंदे व जत येथिल पवार मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल चे डॉ. पराग पवार यांचे चिरंजीव डॉ. यशराज पवार हे युक्रेन या देशात वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी गेले होते.
परंतु रशिया व युक्रेन यांच्यामध्ये युध्द सुरू झाल्यामुळे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. आपली मुले परदेशात युद्ध सुरू असलेल्या ठिकाणी अडकून पडल्याने त्यांचे पालक चिंतातूर व भयग्रस्त झाले होते.त्यातच सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी व जिल्हा पोलिस प्रमुख श्री. दिक्षीत गेडाम यानी सांगली जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी स्थानिक प्रशासनाचे माध्यमातून संपर्क साधून त्यांच्याविषयी सविस्तर माहिती घेतली.
या माहितीच्या आधारे राज्य व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी त्यानी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याने आज युद्ध सुरू असलेल्या युक्रेन या देशातून जत तालुक्यातील हे तिनही विद्यार्थी सुखरूप मायदेशी परत आल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकानी सुटकेचा निश्वास सोडला असून राज्य व केंद्र सरकार चे तसेच स्थानिक मिडीयाचे आभार मानले आहेत.








