200 दशलक्ष डॉलर्सचा अतिरिक्त निधी देणार
रशियाकडुन युक्रेनवर हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनला आर्थिक मदत जाहीर केली आहे. युक्रेनला 200 दशलक्ष डॉलर्सपर्यंतची (सुमारे 15 अब्ज 35 कोटी रुपये) अतिरिक्त मदत प्रदान केली जाणार असून याकरता विदेश विभागाला अधिकृत केले जात असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे.
अतिरिक्त मदत शस्त्रास्त्रांसह सैन्य सेवा, शिक्षण आणि प्रशिक्षणाला व्यापणार आहे. युक्रेनचे सैन्य रशियाच्या आक्रमणाला मागे हटवू पाहत असल्याचे उद्गार बिडेन यांनी काढले आहेत. अमेरिकेकडून युक्रेनला यापूर्वी 1 अब्ज डॉलर्सची मदत करण्यात आली होती.
18 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान मागील आठवडय़ात अतिरिक्त मदतीदाखल 13.6 अब्ज डॉलर्सच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यात युरोपमध्ये सैनिक आणि शस्त्रास्त्रs पाठविण्याच्या खर्चासाठी 6.5 अब्ज डॉलर्स आणि शरणार्थी तसेच आर्थिक मदतीसाठी 6.8 अब्ज डॉलर्सचा निधी सामील आहे. आम्हा सर्वांना मारून टाकले तरच कीव्हवर रशियाचे सैन्य कब्जा करू शकते. बॉम्वर्षाव करगून पूर्ण क्षेत्रातील ऐतिहासिक स्मृती नष्ट केल्यावरच रशियाचे सैन्य कीव्ह ताब्यात घेऊ शकते. रशियाचे हेच लक्ष्य असेल तर त्यांना येऊ दिले जावे. रशियाने 1 लाख सैनिक आणले तरीही युक्रेनवर कब्जा करू शकणार नसल्याचे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांनी एका पत्रकार परिषदेत काढले आहेत.









