युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंसकी हे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या शत्रूंच्या यादीत अग्रस्थानी आहेत. झेलेंस्की यांच्या जीवाला असलेला धोका कायम आहे. युद्ध सुरू झाल्यापासून झेलेंस्की हे बंकरमध्ये राहत असून रात्री केवळ दोन तास झोपत आहेत. तीन ते चार दिवसांमध्ये एकदा ते बंकरमधून बाहेर पडत आहेत. त्यांचे कुटुंब त्यांच्यापासून दूर अन्य बंकरमध्ये आश्रयास आहे. 44 वर्षीय झेलेंस्की यांच्या पत्नी ओलोन या स्वतःच्या पतीच्या सुरक्षेसाठी दररोज प्रार्थना करत आहेत.

झेलेंस्की स्वतःचा बहुतांश वेळ बंकरमध्ये घालवतात, युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने झेलेंसकी यांना केवळ दोन तासांची झोप घेता येत आहे. दर तीन ते चार दिवसांदरम्यान स्थितीचा आढावा घेण्यासाठी ते बंकरमधून बाहेर पडतात. झेलेंस्की यांचे कुटुंब रशियाच्या धोक्यापासून दूर युक्रेनमध्येच लपले असल्याचे सांगण्यात येते. रशियाच्या हल्लेखोरांकडून झेलेंस्की यांच्या पत्नी आणि मुलांनाही धोका आहे.
ओलेना सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय आहेत. सामूहिक दफनभूमी आणि युक्रेनमधील विध्वंसाची छायाचित्रे शेअर करत त्यांनी पाश्चिमात्य देशांना तातडीने पावले उचलण्याचे आणि हा नरसंहार रोखण्याचे आवाहन केले आहे. स्वतःच्या पतीबद्दल चिंता सतावत असते. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 12 पेक्षा अधिक वेळा त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही ते कशाप्रकारे बचावले आहेत. युक्रेनच्या प्रत्येक सर्वसामान्य महिलेप्रमाणे मलाही पतीसंबंधी भीती वाटते. दररोज सकाळी पतीला फोन करण्यापूर्वी सर्वकाही सुरळीत व्हावे अशी प्रार्थना करते. माझे पती अत्यंत मजबूत आणि संयमीत आहेत. स्वतःच्या देशवासीयांच्या हिताची ही लढाई जिंकवण्यास देवाने त्यांना बळ द्यावे अशी प्रार्थना करत असल्याचे ओलेना यांनी म्हटले आहे.









