ऑनलाईन टीम / कीव :
रशिया-युक्रेनमध्ये तणावाचे वातावरण असतानाच पुतीन समर्थक रशियन टिव्हीवरुन युक्रेनला युद्धाची धमकी मिळाली. त्यानंतर युपेनचे राष्ट्रपती व्लोदेयमर जेलेन्स्की स्वत: लष्करी गणवेशात सीमेवर दाखल झाले आहेत. युक्रेनच्या राष्ट्रपतींचे प्रवक्ते इउलिया मेंडल यांनी यासंदर्भात स्थानिक मीडियाला माहिती दिली आहे.
मेंडल म्हणाले,. रशियाने सीमेवर 80 हजार सैनिकांसह रणगाडे, तोफा, घातक आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेली वाहने मोठय़ा प्रमाणावर तैनात केली आहेत. युक्रेननेही 40 हजार सैन्य क्रिमीयामध्ये तर आणखी 40 हजार सैन्य डोनबासमध्ये तैनात केले आहे. रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असून युक्रेन त्याला प्रतिकार करण्यास सज्ज आहे. नुकतीच युक्रेनच्या राष्ट्रपतींनी रशियाला लागून असलेल्या सीमेवरील मारिउपोल भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी लष्कराचा गणवेश आणि हेल्मेट घातले होते. रशियाच्या धमकीसमोर झुकणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.









