वृत्तसंस्था/ किव
युक्रेनची महिला टेनिसपटू डायना यास्त्रमस्का उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने तिच्यावर प्राथमिक स्वरुपाची निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने गुरुवारी दिली.
युक्रेनची 20 वषीय महिला टेनिसपटू यास्त्रsमस्का हिच्या मूत्रल नमुन्याची चाचणी नोव्हेंबरमध्ये माँट्रियलमधील वाडाच्या प्रयोगशाळेत घेण्यात आली होती. त्यात निर्बंध घातलेले द्रव आढळल्याने तिच्याकडून उत्तेजक विरोधी नियमावलीचा भंग झाला. सध्या तिच्यावर प्राथमिक स्वरुपाची निलंबनाची कारवाई करण्यात आली असून या कारवाईच्या कालावधीला 7 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. जागतिक महिला टेनिसपटूंच्या क्रमवारीत यास्त्रsमस्का सध्या 29 व्या स्थानावर आहे. लिन्झमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या टेनिस स्पर्धेवेळी तिची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती आणि या चाचणीत ती निगेटिव्ह असल्याचे आढळून आले होते. या चाचणीपूर्वी दोन आठवडय़ांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत आपल्याला दोषी ठरविल्याबद्दल यास्त्रsमस्काने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी आता आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या शिस्तपालन समितीसमोर चौकशी होणार आहे. या चौकशीनंतरच ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यास्त्रsमस्काला परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आयटीएफच्या प्रवक्त्याने सांगितले.









