सोशल मीडियाद्वारे कंपन्यांवर आणतोय दबाव ःक्रिप्टोद्वारे जमविले 500 कोटी
24 फेब्रुवारी रोजी रशियासोबत युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांनी उपपंतप्रधान मेखाइलो फेडोरोव्ह यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली. जेलेंस्की मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री 31 वर्षीय फेडोरोव्ह यांनी त्वरित समांतर डिजिटल युद्धाची धुरा सांभाळली.
रशियाला जागतिक अर्थव्यवस्थेपासून वेगळे पाडण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधण आणि जागतिक इंटरनेटपासून रशियाला तोडण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली. तांत्रिक नवोन्मेषी राहिलेले फेडोरोव्ह यांनी याकरता सोशल मीडिया, क्रिप्टोकरन्सी यासारख्या अनेक डिजिटल साधनांची मदत घेतली आहे.

ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाद्वारे ऍपल, गुगल, नेटफ्लिक्स, इंटेल, पेपलवर रशियासोबत व्यवसाय न करण्यासाठी त्यांनी दबाव निर्माण केला. 25 फेब्रुवारी रोजी त्यांनी ऍपल, गुगल आणि नेटफ्लिक्सला रशियातील सेवा रोखण्यासाठी पक्ष पाठविले होते. एक आठवडय़ापेक्षा कमी काळात ऍपलने रशियात नवे आयफोन आणि अन्य उत्पादनांची विक्री बंद केली. दुसऱया दिवशी टेस्ला आणि स्पेस एक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांना ट्विट केला आणि सॅटेलाइट इंटरनेट सिस्टीमची फेडोरोव्ह यांनी मागणी केली होती.
गुगल मॅप देखील बंद
रशियाकडून टेलिकम्युनिकेशन उद्ध्वस्त करण्याच्या स्थितीत स्पेसएक्सेचे तंत्रज्ञान युक्रेनला ऑनलाइन ठेवण्यास सहाय्यभूत ठरणार होते. दोन दिवसांनीच मस्क यांनी एक शिपमेंट युक्रेनला पाठविली. फेडोरोव्ह यांनी गुगलचे उपाध्यक्ष करण भाटियांना कॉल केला होता. त्यानंतर गुगल मॅपने स्वतःची अनेक फीचर्स रोखली आहेत.
रशियाला नुकसान
फेडोरोव्ह यांनी रशियाची वेबसाइट आणि ऑनलाइन सेवेला उद्ध्वस्त करण्यासाठी हॅकर्सचा समूह तयार केला आहे. फेडोरोव्ह यांच्या मंत्रालयाने क्रिप्टोकरन्सी फंडही स्थापन केला आहे. याच्या माध्यमातून युक्रेनच्या सैन्यासाठी सुमारे 500 कोटी रुपये जमविण्यात आले आहेत. कमी सैन्यबळ असलेला देश इंटरनेट, डिजिटल मोहीम आणि ट्विटरवर सातत्याने पोस्ट करून रशियासारख्या मोठय़ा देशाची विदेशी मदत कशाप्रकारे रोखता येते हे फेडोरोव्ह यांनी सिद्ध करून दाखविले आहे.









