कोलकाता
गृहकर्ज व्याजदर कपात करण्याच्या शर्यतीत युको बँकेनेही आता उडी घेतली आहे. युको बँकेने व्याजदर 25 बेसीस पॉइंटस्ने कमी केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरहू व्याजदर कपातीमुळे गृहकर्जधारकांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्या समान मासिक हप्त्यावरचा भार हलका होण्यास या दर कपातीमुळे मदत होणार आहे. आता बँकेचा नवा व्याजदर 6.90 टक्के इतका असणार आहे. रिटेल आणि सुक्ष्म, लघु व मध्यम गटासाठी येणाऱया काळात 3 हजार कोटींचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.









