आरोग्य पथकांवर गर्व असल्याचे उद्गार
संयुक्त अरब अमिरातचे (युएई) पंतप्रधान शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. लस टोचून घेतानाचे छायाचित्र त्यांनी ट्विटरवर प्रसारित केले आहे. प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा आणि प्रकृतीसाठी त्याला लस उपलब्ध व्हावी असे त्यांनी म्हटले आहे. लस तयार करणाऱया स्वतःच्या पथकाचे त्यांनी अभिनंदन केले आहे. देशाच्या अनेक मंत्र्यांनाही ही लस देण्यात आली आहे. सरकारने लसीसाठी आरोग्य सेवांशी संबंधित लोकांना आपत्कालीन स्थितीत कोविड-19 बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना नियमांच्या अंतर्गत लस देण्याचा अधिकार दिला आहे.









