सर्वसाधारण वाटणार्या बर्याच सवयी आपल्या आरोग्याला मारक ठरू शकतात. छोटय़ा छोटय़ा सवयींमुळे बरेच दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच आयुष्याला थोडी शिस्त लावून याड सवयी मोडायला हव्यात. कोणत्या आहेत या सवयी? जाणून घेऊ .
- जोरात शिंकणं असभ्यपणाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे चारचौघात असताना शिंक आली तर आपण ती रोखतो किंवा हळूच शिंकतो. शिंक रोखणं चांगलं नसतं. नाक दाबून शिंक रोखल्याने कवटीच्या आतल्या भागावर ताण येतो. यामुळे मेंदूला होणार्या रक्तपुरवठय़ात अडथळा येतो. इतकंच नाही तर रक्तवाहिनी आक्रसते. यामुळे डोकं दुखतं. तसंच श्रवणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो.
- सतत केस धुतल्यामुळे ते खराब होतात. केसांमधलं नैसर्गिक तेल कमी होऊ लागतं. केस कोरडे होतात आणि विस्कटलेले दिसतात.
- घट्ट जीन्स घालणं आरोग्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. जीन्समुळे पायांच्या नसा दाबल्या जातात. यामुळे सतत अस्वस्थ वाटत राहतं. मज्जासंस्थेवरही याचा दुष्परिणाम होऊ शकतो. घट्ट जीन्समुळे पायांना होणार्या रक्तपुरवठय़ावर परिणाम होऊ न संवेदना हरवू शकतात.
- रात्री झोपण्याआधी स्मार्टफोन वापरल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो. स्मार्टफोनच्या अशा नियमित वापरामुळे निद्रानाश होऊ शकतो. फोनमधल्या कृत्रिम दिव्यामुळे मेलाटोनिन नामक झोपेच्या हार्मोनची निर्मिती कमी होऊ शकते.
- झोपण्याआधी कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवल्या नाहीत तर सकाळी उठल्यावर डोळे दुखू शकतात. या सवयीमुळे दृष्टीपटलावरही परिणाम होऊ शकतो.
- भरपूर पाणी पिणं गरजेचं असलं तरी त्याचंही ठराविक प्रमाण आहे. जास्त पाणी प्यायल्यानेही काही विकार उद्भवू शकतात. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने वजन वाढू शकतं. पोट फुगल्यासारखं वाटतं. तासाभराच्या कालावधीत एकपेक्षा जास्त वेळ लघवीला जावं लागणं हा जास्त पाणी पिण्याच संकेत असू शकतो.
- वेदनाशामक औषधांच्या मार्यामुळे प्रसंगी डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
- सनस्क्रीनचा सततचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. सूर्यप्रकाशामुळे शरीराला ड जीवनसत्त्व मिळतं. पण सनस्क्रीनमुळे त्वचा ‘ड’ जीवनसत्त्व शोषून घेऊ शकत नाही. यामुळे हाडांशी संबंधित विकार उद्भवू शकतात.









