ऑनलाईन टीम/तरुण भारत
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर एकामागोमाग एक भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूरला येणार असल्याचं बुधवारी म्हंटल आहे. सोमय्या यांनी येत्या मंगळवारी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा गाजणार आहे. कारण मुरगूड नगरपालिकेने सोमय्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव मंजूर केला आहे. मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.
सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूरला येणार असल्याचं बुधवारी सांगितल्यानंतर मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. यावेळी यासभेत झालेल्या ठरावात किरीट सोमय्यांना एन्ट्री द्यायची नाही, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सोमय्यांचा नियोजित दौर्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ठराव मंजूर केला आहे.
बुधवारी पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते किरीट सोमय्या…