ऑनलाईन टीम / नाशिक :
मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असे शरद पवारांनी आज स्पष्ट केले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला संबोधित करतांना राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसैनिकांना दिले. त्यांच्या याच विधानावरशरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- पंकजा मंडेंच्या ट्विटला शरद पवार यांचा प्रतिसाद
पंकजादेखील चांगले काम करत असल्याची कौतुकाची थाप शरद पवार यांनी मारली आहे. पवारसाहेब हॅट्स ऑफ… आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असे ट्विट करत पंकजा यांनी शरद पवार यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला होता. यालाच आता शरद पवार यांनी प्रतिसाद दिली आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.








