ऑनलाईन टीम / पुडुचेरी :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक क्षेत्रात विविध निर्णय घेतले जात आहेत. बऱ्याच राज्यांनी एक किंवा दोन विषयांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, पुडुचेरी राज्याने या वर्षासाठी चक्क दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे.
याबाबत पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी सांगितले की, यावर्षी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून, अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.









