पुणे \ ऑनलाईन टीम
काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला चांगलेच माहिकी आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर केली आहे. ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर अजित पवार म्हणाले, काही काहीजण भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात. कायदा, संविधान काहीही बघत नाहीत. म्हणून ती बातमी चालते. ही लोक काही काळ आमच्या बरोबर होती. त्यांचा आवाका किती आहे. हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे फार महत्त्व देत नाही, असं अजित पवार म्हणाले.
खासदार संभाजीराजे यांनी दिलेल्या इशाऱ्यावरही अजित पवार यांनी भूमिका मांडली. मी त्यांच्याशी बोललो होतो. पण त्यांनी सांगितलं की, ६ तारखेचा कार्यक्रम होऊ द्या. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. आता महाविकास आघाडी सरकार त्यावर लवकरच निर्णय घेईल असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही राज्यपालांना भेटलो आहोत, आता वरिष्ठांनाही भेटणार आहोत. कोर्टाने जे ग्राह्य धरलंय त्यानुसार साकल्याने विचार करू. माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले, आणि सदस्य यांचे मत घेतोय. लवकरच आम्ही यावर तोडगा काढू, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते तर विरोधकांनी त्याचे श्रेय घेतले असते. आम्हीच मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. आम्हीच असं केलं होतं, असे भाजपचे नेते म्हणाले असते. भाजप नेत्यांच्या याच वृत्तीचा मला राग येतो, असे अजित पवार यांनी म्हटले.राज्य सरकारला सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे सारथी संस्थेसंदर्भात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.
मी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याच्या घटनेला आता चौदा महिने उलटून गेले आहेत. तरीही चंद्रकांत पाटील जुन्या गोष्टी उकरुन काढत आहेत. ज्यांना काम नाही ते लोक नको त्या गोष्टी बोलतात. सध्याच्या घडीला कोरोना परिस्थितीकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले.
Previous Articleसांगली : शिवरायांचा लोककल्याणकारी स्वराज्याचा आदर्श घेवून जिल्हा परिषदेने कार्य करावे : पालकमंत्री
Next Article भाजप कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब








