ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे चीनची डोकेदुखी आता वाढली आहे.
कोरोनाचा हा नवा स्ट्रेन ब्रिटनमधून इतर देशात फैलावत आहे. त्यामुळे ब्रिटनने तीन चतुर्थांश भागात कडक लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच खबरदारी म्हणून जगभरातील जवळपास 50 देशांनी ब्रिटनची विमानसेवा काही दिवसांसाठी स्थगित केली आहे.
दरम्यान, चीनमध्ये आतापर्यंत चार लसींच्या वापराला मंजूरी मिळाली आहे. गुरुवारी चीनची सरकारी कंपनी ‘सिनोफार्म’द्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना लसीला सशर्त मंजूरी दिली आहे. ही लस सर्व सामान्यांसाठी उपलब्ध आहे.









