ऑनलाईन टीम / ढाका :
बांग्लादेशचा सलामीवीर लिटन दास याच्या घरात गॅस सिलेंडचा स्फोट झाला आहे. त्या दुर्घटनेत लिटन दास याची पत्नी देवश्री बिश्वास संचिता हीचा हात भाजला आहे.
देवश्री बिश्वास संचिता यांनी एका संकेतस्थळाला याबाबतची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, मी स्वयंपाकघरात चहा करत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यावेळी स्वयंपाक घरातील ट्रॉलीचा एक तुकडा तुटून माझ्या अंगावर उडाला. त्यावेळी मी चेहरा कसाबसा भाजण्यापासून वाचवला. मात्र, माझा हात या स्फोटात भाजला गेला.
सिलिंडरमध्ये छिद्र असल्याने सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती लिटल दासच्या कुटुंबियांनी दिली आहे. लिटन दास बांग्लादेशचा यष्टीरक्षक आहे. काही महिन्यांपूर्वी विश्वचषक संपल्यानंतर त्याने देवश्रीसोबत लग्न केले होते.









