ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यासोबत आता सीआयएसएफच्या 40 जवानांचे कवच असणार आहेत.
सोमय्या मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत होते. तसेच आघाडी सरकारमधील अनिल परब, मिलिंद नार्वेकर, छगन भुजबळ यासह अन्य नेत्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांना धमक्या येत होत्या, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. धमक्यांच्या भीतीपोटी त्यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. पेंद्र सरकारने तात्काळ ही मागणी मान्य केली असून, त्यांना 40 जवानांचे कवच असलेली झेड सुरक्षा पुरविण्यात आली आहे.








