प्रतिनिधी / शिरोळ
सध्या परिस्थिती अत्यंत कठीण असून अशा कठीण परिस्थिती रुग्णाला आधार देणे हे डॉक्टरांचे आद्य कर्तव्य आहे या कर्तव्याला जागून आजही वयाच्या 68 वर्षी 12 ते 14 सेवा करीत असल्याची माहिती डॉक्टर एस पी माने यांनी सांगितले.
गेल्या सहा महिन्यापासून बारा ते चौदा तास अविरतपणे रुग्णाची सेवा डॉ. एस पी माने हे करीत आहेत गेली 42 वर्ष वैद्यकीय सेवा करीत आहेत. आज ते 68 वर्षाचे असून सकाळी नऊ वाजलयापासुन रात्री दहा वाजेपर्यंत येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना धीर देण्याचे काम करीत आहे.
कोरोनाविषाणू थैमान मांडले आहे शिरोळ तालुक्यात दिवसेंदिवस याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, अनेकांचे बळी जात आहेत. डॉ. एस पी माने यांच्या श्री हॉस्पिटलमध्ये शिरोळ अर्जुनवाढ कनवाड कुटवाड हसून शिरटी चिंचवाड यांसह अन्य भागातून रुग्ण येत आहे. ते एम बी बी एस असून डॉ. एस पी माने हे वैद्यकीय सेवेत त्यांचा हातखंडा मोठा आहे.
आजही ते येणाऱ्या रुग्णांशी आपुलकीने चौकशी करून त्यांना धीर देण्याचे काम करीत आहे शिरोळ तालुक्यात अनेक खाजगी दवाखाने आहेत. बहुसंख्य डॉक्टरांनी या कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर मर्यादित रुग्ण तपासणी करीत असल्याची चर्चा आहे. बहुसंख्य डॉक्टरनाही या विषाणूंचा प्रादुर्भाव झाला असून होमक्वारंटाईन काही डॉक्टर झाले आहेत. त्यामुळे काही खाजगी दवाखाने बंद केल्याचे दिसून येते.
परंतु गेले सहा महिने झाले या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढत असता देखील डॉक्टर एस. पी. माने यांनी अखंडपणे आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की 80 ते 90 पेशंट रोज विविध आजाराने उपचारासाठी येत असतात येणाऱ्या पेशंटना धीर देणे हे डॉक्टर नागरिकांनीही कोरोनाविषाणू न घाबरता लक्षणं दिसू लागल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी तसेच प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांचे चिरंजीव डॉ. अमेय माने हे बालरोगतज्ञ असून तेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सेवा बजावीत आहेत. कोरोना लहान मुलांना लवकर होण्याचा होण्याची भीती असते या लहान मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. व्हायरलमुळे इतरांना त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सर्वांनी खबरदारी घेतल्यास या रोगावर मात करू शकतो असा विश्वास त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









